आपण भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान तर आहेच त्याबरोबरच आपल्या मातृभाषेवर सुद्धा सर्वांचे खूप प्रेम आहे. बरेचजण एकमेकांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ते त्या प्रदेशात गेले की तिथे त्याप्रमाणे बोलू शकतात आणि त्यांची भाषा समजू शकतात. तुम्ही अनेकांना हिंदी, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आशा भाषा शिकताना पाहिले असेल.
परंतु महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजेच मराठी शिकताना खूपच कमी जणांना पाहिले असेल. असाच एक आपल्या सर्वांना आपल्या मराठी भाषेवर गर्व वाटेल असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या व्हिडिओत नक्की काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा. ही एक रशियन मुलगी आहे जिने अत्यंत उत्तमरित्या मराठीमध्ये बोलण्याचे शिकत आहे.
तिची मराठी ऐकून तुम्ही सुद्धा दंग राहाल. एखादी परदेशी महिला आपली मराठी भाषा बोलते यापेक्षा जास्त गर्वाची गोष्ट काय असू शकते. ज्यावेळी ही रशियन मुलगी महाराष्ट्रात येते त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह केला. त्यावर ती मराठीमध्ये त्यांना मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे असेही म्हणते.
या व्हिडिओमध्ये तिने महाराष्ट्रातील पुणे शहराचे खूपच कौतुक केले आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ हे पुणेकरांचे प्रसिद्ध वाक्य सुद्धा तिने म्हणून दाखवले आहे. पुण्यातील शनिवार वाडा, वडापाव तसेच शिवाजी महाराजांना तिचे शतशः नमन असेही ती उच्चारत आहे. खरंच एक परदेशी महिला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेचे कौतुक करते हे ऐकून छाती भरून येते.
हिने मराठी शिकण्याचा अत्यंत चांगला आणि मनापासून प्रयत्न केला आहे. ती मराठीमध्ये बरेच काही बोलते आणि ते पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कमेंटमध्ये तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि रशियन मुलीबद्दल काय वाटते सांगायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: