आयएएस असून रस्त्यावरच्या मुलाला कसे प्रोत्साहन दिले पहा

कलाकार

आपला देश हा अजूनही पुर्णपणे साक्षर झालेला नाही. देशात अशी अनेक मुलंमुली आहेत ज्यांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे शाळेत जाता येत नाही. एका कुटुंबामध्ये तीन-चार मुले जन्माला येत असल्यामुळे सर्वांचा खर्च सुद्धा त्या घरातील आईवडील उचलू नाही शकत आणि त्यामुळेच मुलांना लवकर कामाला लावून पैसे कमवायला शिकवले जाते.

नेहमी प्रमाणेच तुमच्यासाठी आजही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक गरीब मुलांना पाहू शकता. यामध्ये आयएएस दीपक रावत सुद्धा तुम्हाला त्या मुलांबरोबर दिसतील. एवढे मोठे शिक्षण घेऊनही ते गरीब मुलांमध्ये जाऊन तुम्हीही शिक्षण घ्या आणि पुढे जावा अशी आशा त्यांच्या मनात जागवत आहेत.

व्हिडिओच्या शेवटी त्या मुलाला दीपक काहीतरी देऊन तो मुलगा प्रोत्साहित होईल असे काहीतरी बोलतात. ते पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ एकदा नक्की पहा. ते पाहून तुम्हाला दीपक यांच्याबद्दल आदर वाटेल. तो मुलगा रोज काय काम करतो हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. त्याचे ते काम करण्याचे कौशल्य पाहून तुम्हालाही नवल वाटेल.

पाण्यामध्ये वाहत येणारे नारळ हे पुलावरून खाली दोरी टाकून पकडतात. मग ते पाण्याबरोबर वाहणारे नारळ जाळ्यात बरोबर कसे अडकतील हे त्यांना बारकाईने बघावे लागते. रोज जास्तीत जास्त २०० रुपयांची त्यांची कमाई होते. हे पाण्यातून नारळ पकडायचे काम तिथे अनेकजण करतात आणि  स्वतःचे व कुटुंबातील व्यक्तींचे पोट भरतात. आशा गरीब मुलांना आपणही मदत केली पाहिजे आणि त्यांना शाळेत जायला प्रोत्साहन दिले पाहिजे. तेव्हाच आपला देश हा पूर्णपणे साक्षर बनू शकतो.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *