लहान मुलांना आजकाल काही शिकवायची गरज लागत नाही. ते एवढे हुशार असतात की आपल्यालाच त्यांना पाहून आणि त्यांचे बोलणे ऐकून गर्व वाटतो. मुलांना मोबाईल, टीव्ही या गोष्टी असल्या की दुसरे काही लागत नाही. मैदानी खेळ तर काही मुले विसरूनच गेली आहेत. पण एकीकडे जी गरिबांची मुले आहेत त्यांचे आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने असते.
त्यांना पाहिजे त्या सुखसोयी मिळत माहीत. लहान वयात काम करायला लागते कारण पोट भरायचे असते. गरीब असले तरीही ते हुशार असतात. या मुलांनाही प्रत्येक गोष्ट शिकण्याचा हक्क आहे. आज जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो पाहून तुम्हाला त्या गरीब मुलीचा गर्व वाटेल. तिच्याकडे पाहून तुम्हाला वाटणारही नाही की ती एवढं चांगलं वाजवू शकते.
म्हणूनच दिसण्यावर जाऊ नये कारण समोरची व्यक्ती किती हुशार आहे हे पाहताक्षणी कोणी सांगू नाही शकत. ही लहान मुलगी एका कार्यक्रमात वाजवत आहे आणि बाकीचे लोक डान्स सुद्धा करत आहेत. अतिशय कुशल असल्याप्रमाणे ती ते वाजवत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल की काहीजण तिची वाजवण्याची कला पाहून तिला पैसेही बक्षीस देत आहेत. बरेचजण तिचा व्हिडिओ काढत आहेत. या मुलीचे नाव नयन विश्वास वडे असे आहे आणि ती भिवंडी येथील आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
पहा व्हिडीओ: