आपल्या देशात रोडवरून गाडी चालवणे हे सध्या खूपच कठीण होत चालले आहे. लोकसंख्येच्या बरोबर गाड्यांचेही प्रमाण तेवढेच वाढत आहे. यामध्ये सार्वजनिक वाहन चालक तर अतिशय भयानक पद्धतीने गाडी चालवतात त्यामध्ये तुम्ही पहिला नंबर रिक्षा चालकांचा लावू शकता. जवळपास सर्वांनाच अनुभव असेल की रिक्षा चालक हे रिक्षा कश्या पद्धतीने चालवतात.
काहीजणांचा रिक्षा चालकांमुळे अपघात देखील झाला असेल. त्या चालकांची बोलण्याची पद्धत सुद्धा खूप क्रूर असते. कोणालाही ते नीट नाही बोलत. इथेही आज असा व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये रिक्षाचालकामुळे काय झाले हे पाहून तुम्ही दंग राहाल. तुम्ही जर सुरुवातीपासून पाहिले तर तुम्हाला समजेल की हा रिक्षाचालक कशी रिक्षा चालवत आहे.
तसेच तो बाकीच्यांनाही तो त्याच्या पुढे जाऊन देत नाहीये. हा रिक्षा चालक विदेशी आहे. मागे त्याच्या एक दुचाकी आहे पण त्याला पुढे जायला मिळत नाही. नंतर त्याला एका मुलीने रिक्षा थांबवण्यासाठी हात केला तेव्हा तर त्याने कहरच केला. आधीच तो खूप फास्ट चालवत होता त्यावेळीच मागूनही दुचाकीस्वार होता
आणि रिक्षावाल्याने काहीही इंडिकेटर न दाखवता अचानक त्याची रिक्षा त्या मुलीकडे नेली आणि त्या बिचाऱ्या दुचाकीस्वाराला रोडच्या बाजूला गाडी न्यावी लागली आणि तो गाड्यांवर जाऊन पडला. हा एक प्रकारचा कॉमेडी व्हिडिओ आहे. नक्की पहा कारण एकदा पाहिलात तर तुम्हाला हा व्हिडिओ परत परत पाहावा असे वाटेल.
पहा व्हिडीओ: