तुम्ही आजवर अनेक नाटके पाहिली असतील किंवा मिमिक्री पाहिल्या असतील. जिथे तुम्हाला आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा हुबेहूब असा आवाज काढणारे मिळाले असतील. खरंच ही कला खूप सुंदर आहे. एकच व्यक्ती वेगळे वेगळे आवाज काढू शकतो. ही कला खूप ठिकाणी उपयोगाला सुद्धा येते आणि अनेकजणांची यामुळे कमाई सुद्धा होते.
आज तुमच्यासाठी असाच एक मिमिक्री वाला व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याचे वेगळे वेगळे आवाज ऐकून तुम्ही दंग राहाल. व्हिडिओतील व्यक्तीचे नाव सुधीर वानखेडे आहे. सुधीर हे महाराष्ट्रातील अमरावती येथील आहेत. सुधीर हे महाराष्ट्रातील आहेत म्हणल्यावर पुढे अजून वाचण्याची तुमची इच्छा झाली असेलच. या व्हिडिओमध्ये सुधीर यांना तुम्ही रेल्वेचे अनेक आवाज काढताना पाहू शकता.
रेल्वे जेव्हा प्लॅटफॉर्म वरून निघते, ब्रिजवरून जाताना तसेच एक रेल्वे जेव्हा दुसऱ्या रेल्वेजवळून जाते असे अनेक आवाज त्याने काढून दाखवले आहेत. त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा खूप चांगले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्याबद्दल तुमची काय मते आहेत हे आम्हालाही नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
पहा व्हिडीओ: