सर्वांना माहीत आहे की, लहान मुलांना शाळेत जायला किती आवडते. तुम्हालाही लहान असताना शाळेत जायला आवडायचे का? की पोट दुखत आहे म्हणून रडायचे आणि शाळेत नाही जायचे किंवा कधी मुद्दाम आजारी पडायचे आणि शाळा बुडवायची नाहीतर घरी कोणी पाहुणे आले की शाळेत जायचे नाही. अश्या अनेक कारणांमुळे तुम्ही शाळा कधी बुडवली आहे का?
आता त्या जुन्या गोष्टी आठवून तुम्हालाही हसू आले ना? तुमचे असे प्रसंग कमेंटमध्ये आमच्याबरोबरही नक्की शेअर करा. लहान मुलं ही खूप निरागस असतात त्यांनी काहीही बोलले तरी त्यांच्यावर दया येते आणि हसू सुद्धा येते. त्याच्या आईवडिलांशिवाय त्याची नाटके इतर कोणालाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने माहीत नसतात जेवढे आईवडील ओळखतात.
नंतर येतात ते आपले शाळेतील शिक्षक. शिक्षकांना सुद्धा अशी मुले वेड्यात काढतात. काहीही कारणे देऊन शिक्षकांना भुलवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते हे विसरतात की, शिक्षकांना या सर्व गोष्टींचा अनुभव आहे की मुलं शाळा का बुडवतात. तरीही मुलांचे खोट सांगण्याचे धाडस होते. असाच हा व्हिडिओ आहे जिथे तुम्ही त्या मुलाने शाळा बुडवण्याचे कारण असे सांगितले की
आईवडील शाळेत जाऊ नको बोलले आणि जर तो खोट बोलत असेल तर त्याचे कान रात्री दुखतील. अन जर कान दुखले तर तो शिक्षकांना सकाळी शाळेत आल्यावर प्रामाणिकपणाने सांगेल. हाहा!! व्हिडिओतील शिक्षकही खूप हुशार आहेत. यावर शिक्षक काय उत्तर देतात हे व्हिडिओमध्ये नक्की पहा. या विद्यार्थी आणि शिक्षकाच्या मधला हा संवाद तुम्ही नक्कीच पहावा आणि याची मजा घ्यावी.
पहा व्हिडीओ: