बहिणीच्या डोहाळे जेवणात केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल

डोहाळजेवण हे बऱ्याच ठिकाणी मोठा कार्यक्रम करून साजरा केला जातो. ज्याप्रमाणे लग्नकार्यात किंवा हळदीच्या वेळी डान्स केला जातो त्याप्रमाणेच आता डोहाळ जेवणात सुध्दा डान्स केला जातो. आज जो व्हिडिओ इथे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तोही एका डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाचा आहे. घरात एक नवीन पाहुणा येणार त्यामुळे घरातील सर्वचजण खूप आनंदित असतात.

येणाऱ्या पाहुण्याच्या तयारीत वेळ कसा निघून जातो हे समजतही नाही. व्हिडिओतही तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेल्या अनेकजणांना पाहू शकता. इथे दोन मुली नाचत आहेत आणि दोघींचाही हा डान्स खूप सुंदर आहे. दोघींनीही सारख्या रंगाचे म्हणजेच काल्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स तसेच चेहऱ्यावरचे हावभाव सुध्दा खूप सुंदर आहेत.

शेवटी त्या दोघीही जमलेल्या सर्वांना डान्स करण्यासाठी बोलवतात आणि बाकीचेही येऊन जसे जमेल तसे नाचून आनंद घेत आहेत. शेवटी आपल्याला किती आनंद मिळतो हेही खूप महत्त्वाचे असते. जिचे डोहाळजेवण आहे तिलाही खूप आनंद झाला आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:


Posted

in

by

Comments

One response to “बहिणीच्या डोहाळे जेवणात केलेला डान्स पाहून त्यांच्या प्रेमात पडाल”

  1. 365ph Avatar

    [8115]365ph Online Casino Philippines: Best Slot Games, Easy App Download, Login & Register Today! Join 365ph Online Casino Philippines for the ultimate gaming experience! Enjoy top-rated 365ph slot games with a quick 365ph login. Complete your 365ph register today and get the seamless 365ph app download for mobile play. Experience secure winning at the best 365ph online casino now! visit: 365ph

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *