आदिवासी मुलींचा गरबा पाहून चकित व्हाल

कलाकार

सणवार म्हणलं की आपल्या महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. सण यायच्या आधीच त्याची तयारी चालु होते. घरात तर हे सण साजरे होतातच त्याबरोबरच काही सण असेही आहेत जे आपण सार्वजनिक ठिकाणी साजरे करू शकतो. गणपती असो किंवा दसरा अशावेळी सार्वजनिक ठिकाणी मंडप लावले जातात आणि विविध कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात.

असाच एका सार्वजनिक कार्यक्रमाचा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ एका गरब्याचा आहे. दसऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी हा लोकप्रिय नृत्यप्रकार केला जातो. काही ठिकाणी यावेळी बऱ्याच महिला तसेच लहान मुली जमलेल्या असतात आणि टिपऱ्या खेळतात. अनेक गरब्याची गाणी सुध्दा त्यावेळी डॉल्बी वर वाजवली जातात. सर्वजण या गाण्याच्या तालावर नाचत असतात.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही मुलींचा ग्रुप इथे टिपऱ्या खेळत आहेत. काहींनी साडी घातली आहे तर काहींनी घागरा किंवा ड्रेस घातला आहे. त्यांनी बराच मेकअप केला आहे. जेव्हा त्या हात वर धरून टिपरी फिरवतात ते खूप बघण्यासारखे आहे. विशेष म्हणजे सर्व मुली ती स्टेप खूप सुंदर करत आहेत. आपल्याला ते सहजासहजी जमणार नाही. तो त्यांचा डान्स खूपदा बघितला तरी मन भरत नाही. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *