मराठमोळ्या गणेश आचार्य चा या मुलीसोबत डान्स होतोय वायरल

कलाकार

बॉलिवूड मध्ये अनेक गाणे तसेच चित्रपट त्यामधील एका विशिष्ट स्टेपमुळे प्रसिध्द होतात ज्याला आपण हूक स्टेप म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांना गाण्यातील हूक स्टेप करताना पाहता आणि त्या बऱ्याच प्रसिध्द होतात. यामागे या गाण्याची कोरिओग्राफी सुध्दा तेवढीच महत्वाची असते. कोरिओग्राफर गाण्याच्या स्टेप्स ठरवण्यासाठी खूप कष्ट घेतात आणि अशाच एका खूप प्रसिध्द कोरिओग्राफरचा व्हिडिओ इथे घेऊन आलो आहे.

तुम्हाला गणेश आचार्य हे माहीतच असतील. गणेश यांनी आजपर्यंत खूप गाण्यांना कोरिओग्राफ केले आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही गणेश यांच्याबरोबर प्रेरणा वलेचा यांना पाहू शकता. सलमान खान आणि करिश्मा कपूर यांच्या ‘ प्यार दिलो का मेला हैं‘ या सुपरहिट गाण्यावर या व्हिडिओमध्ये गणेश आणि प्रेरणा यांचा सुंदर डान्स पाहू शकता.

दोघेही खूप सुंदर नाचत आहेत. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी गणेश यांच्या चेहऱ्यावरील हावभाव तुमचे मन वेधून घेतील. त्यांचे डोळे खूप काही सांगून जातात. ते खूप मनापासून डान्स करतात त्यामुळे डान्स करताना जरी कष्ट घ्यावे लागत असतील तरी ते अगदी सहजपणे नाचत आहेत असच पाहणाऱ्याला वाटते. तुम्हाला सुध्दा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *