या आयएएएस तरुणीची एंट्री बघून अंगावर काटा येईल

कलाकार

मुलगी जन्माला आली की, बहुधा सर्वच घरांमध्ये नाराजीचे वातावरण असते. सर्वांना मुलगी जन्माला नको असते कारण ती घराचा वंश नाही चालवणार असे वाटते. वंश पुढे न्यायचा असेल तर मुलगाच पाहिजे अशी लोकांची समज आहे. परंतु आता समाजातील ही परिस्थिती आणि मनस्थिती बरीच बदलली आहे. मुलीलाही आता सरकारने बरीच आरक्षण, हक्क दिले आहेत. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला पाहून असे समजून येईल की, मुलीही आता मुलांपेक्षा काही कमी नाहीत.

 

प्रत्येक क्षेत्रात मुलांबरोबर मुलीही तुम्हाला दिसतील. आजकाल मुले आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत परंतु तेच काम मुलगी अगदी जिव्हाळ्याने करताना दिसते. मुली आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात प्रगती करताना आणि उच्च पदावर कार्यरत असताना दिसत आहेत. अशाच एका आयएएस महिलेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या आयएएस महिलेचे नाव स्मिता सबरवाल आहे.

जर तुम्ही विडिओ पाहाल तर तुम्हाला समजेल की ज्या मुलींचा जन्म सुध्दा लोकांना आधी नको होता त्या आज किती पुढे गेल्या आहेत. या आयएएस महिलेला सर्वजण सलाम करत आहेत आणि ती स्वाभिमानाने आपले काम करत आहे. तिचा पोशाख सुद्धा तुम्ही पाहाल तर तिच्या कामाशी अगदी साजेसा आहे. यावरून आपल्याला सामाजिक भावनेचे ज्ञान सुद्धा दिसून येते. स्मिता या तेलंगणाची आयएएस ऑफिसर आहे. ती दिसायला सुंदर आणि खूपच बुद्धिमान आहे.

एका मुलीला पुरुष इन्स्पेक्टर सलाम करतात हे पाहून कोणत्या महिलेला असे कर्तृत्व नको वाटेल. तिच्या आईवडिलांना सुद्धा खूप गर्व वाटत असेल की, आपली मुलगी आज उच्च पदावर कार्यरत आहे आणि देशाची सेवा करत आहे. सुरुवातीला स्मिता यांची पहिली पोस्ट चित्तुर मध्ये सबपोलिस म्हणून झाली. जनतेच्या भल्यासाठी त्यांनी अनेक प्रोजेक्ट राबवले आणि यासाठी प्राईम मिनिस्टर एक्सलेंट अवॉर्ड सुद्धा मिळाला.

आज स्मिता मुख्यमंत्र्यांची सेक्रेटरी म्हणून काम करत आहे. स्मिता या देशाची सेवा करत असताना घरही सांभाळतात. त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा व एक मुलगीही आहे. त्यांनी आयपीएस ऑफिसर अकुल सबरवाल बरोबर लग्न केले. तुम्हालाही स्मिताबद्दल किंवा महिलांच्या हुशारीबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *