आजकाल जस जग बदलत आहे. त्याचप्रमाणे प्रथा देखील बदलताना दिसून येतात. पूर्वी लग्न आई वडील ठरवायचे, ते म्हणतील त्याच्याशीच लग्न करावे लागायचे. मात्र आता दिवस बदलले, काळ बदलला त्यानुसार प्रथा देखील बदलल्या. अनेक जण आता लव्ह मॅरेज करताना दिसतात, लिव्ह इन मध्ये देखील राहताना दिसतात. तसेच नवरी नाही तर आता नवरा लाजायला लागला असे म्हणता येईल.
मुलगी आपल्या लग्नात काय काय करायचे हे दोन महिन्याआधीच ठरवते आणि त्याच्या तयारीला लागते. आजवर तुम्ही नव्या फॅशनमध्ये नवरा नवरीला नाचत स्टेजवर आणताना त्यांच्या मित्र मैत्रिणींचा डान्स पाहिला असेल. मात्र आज तुम्हाला नवरी स्वतःच्याच लग्नात नाचत येताना दिसते. लाल रंगाचा घागरा नवरीचा मस्त मेकअप त्यासोबत उत्तम डान्स मध्ये ती लोकांना आकर्षित करते.
नाचत ती स्टेजजवळ येते त्यानंतर नवऱ्याचा हात धरून ती वर जाते. खूप सुंदर आणि मनमोहक दृश्य वाटते. तुम्ही देखील असे किस्से लग्नामध्ये पहिले असतील. जर पहिले नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेच. आजकाल मुलींना नाचत यावं म्हणून देखील अशी फॅशन अली असावी असे वाटते. कारण पूर्वी वरातीमध्ये फक्त मुलांना नाचत येत होते.