देवमाणूस मालिकेतील टोण्याची खरी आई पहा

कलाकार

झी मराठी निर्मित श्वेता शिंदेच्या ‘देवमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील आजी, टोन्या आणि डिंपल हे त्रिकुट खूप प्रसिद्ध होत आहे. खूप प्रेक्षक असेही असतील जे या तिघांमुळे मालिका बघत आहेत. या तिघांच्याही अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत विविध घटना दाखवल्या आहेत.

 

ज्या मुळे तुम्हाला पुढे काय होईल हे पाहण्याची नेहमीच उत्सुकता असेल. डिंपलला सिम्पल राहायला आवडत, हा या मालिकेतील तिचा डायलॉग सुद्धा प्रसिद्ध आहे. डिंपलची भूमिका अस्मिता देशमुखने साकारली आहे. आज आपण देवमाणूस या मालिकेतील टोन्या या पात्राबद्दल माहिती घेणार आहोत. टोन्या ही भूमिका बालकलाकार विरल माने साकारत आहे.

या मालिकेतील टोन्या हा सगळ्यांना खूप मनमुराद हसवतो. देवमाणूसच्या शूटिंग सेटवर नुकताच त्याचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाला त्याच्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा हजर होत्या. विरल माने हा साताऱ्यातील एका छोट्याश्या गावामध्ये राहतो. त्याच्या कुटुंबात त्याचे आई, वडील आणि मोठी बहीण आहेत. त्याच्या वडिलांचे नाव अमित माने आहे तर शोभा माने हे त्याच्या बहिणीचे नाव आहे.

विरलची बहीण म्हणजेच शोभा ही मुंबईतील भारत डायमंड कंपनीमध्ये नोकरी करत आहे. तर त्याचे आईवडील हे गावाकडेच असतात. विरलला शैक्षणिक अभ्यासाबरोबरच अभिनयाचीही खूप आवड आहे आणि तो नृत्यही उत्तम करतो. या मालिकेतील त्याचा अभिनय पाहता तो पुढे जाऊन नक्कीच अभिनय क्षेत्रात काम करेल असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *