रंग माझा वेगळा मधली काळी दीपा पहा किती सुंदर दिसते

कलाकार

प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री हे तेव्हाच प्रसिद्ध होतात ज्यावेळी त्यांचा अभिनय हा ते जी भूमिका साकारत असतात ती मनापासून करत असतात. ज्या पात्राची भूमिका साकारायची असते ते पात्र आधी खूप अभ्यासावे लागते त्यानंतरच त्यावर चांगला अभिनय होऊ शकतो. अशाच आपल्या प्रगल्भ, अतिशय संवेदनशील अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत.

आपण इथे आज ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा देवकुळे आणि आता दीपा इनामदार झालेल्या अभिनेत्रीबद्दल माहिती घेणार आहोत. दिपाचे खरे नाव रेश्मा शिंदे आहे. तिचा जन्म २७ मार्च १९८७ ला मुंबईमध्ये झाला आहे आणि तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे. रेश्माचे लग्न झालेले आहे. तिच्या आयुष्यातील जोडीदाराचे नाव अभिजित चौगुले आहे.

रेश्मा आणि अभिजित यांचे लग्न २९ एप्रिल २०१२ मध्ये झाले. अभिजित हा मूळचा कोल्हापूरचा आहे परंतु तो सध्या पुण्यामध्ये नोकरी करतो. तो सिव्हिल इंजिनिअर आहे. रेश्माची टीव्हीच्या पडद्यावर सुरुवात ही २०१० मधल्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या मराठी शोपासून झाली. त्याच शोमध्ये ‘बंध रेशमाचे’ या मालिकेच्या निर्मात्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते.

त्यानंतर तिने ‘बंध रेशमाचे’ ही मालिका केली. रेश्माने नंतर ‘लगोरी मैत्री’ ही मालिका केली आणि ती त्यामुळे एक स्टार झाली. तिच्या या पूर्ण करिअरमध्ये तिने झी मराठीवरील ‘नांदा सौख्यभरे’ यात महत्त्वाचे काम केले आहे. तिने मराठी चित्रपटात सुद्धा काम केले आहे. ‘देवा एक अंतरंगी’ हा तिचा पहिला चित्रपट २०१७ मध्ये आला. ‘रंग हे प्रेमाचे, एक अलबेला, लालबागची राणी’ यासारख्या चित्रपटात सुद्धा तिने काम केले आहे.

सध्या ती आपल्याला ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत एक सोज्वळ मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे, जिला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व व्यक्तींची काळजी असते आणि ती भूमिका रेश्मा अतिशय चांगल्या पद्धतीने निभावत आहे. अशी ही रेश्माची आजपर्यंतची सिनेसृष्टीतील कारकीर्द आहे आणि पुढेही ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *