टीव्हीमुळे तसेच अनेक सोशल मीडियामुळे बऱ्याच जणांचे मनोरंजन होते. छोट्या पडद्यावर अनेक नवीन नवीन मालिका या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. ज्यामुळे आपल्या घरातील अनेकांचे मनोरंजन होते. मालिका जर चांगली असेल तर पुढे त्या मालिकेत काय होईल यांच्याकडेही बऱ्याच जणांचे लक्ष लागून असते आणि पुढच्या एपिसोडची ते वाट बघत असतात.
अशीच एक नवीन मालिका आता अली आहे जीचे नाव आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेचे शीर्षक गीत तर तुम्ही ऐकलेच असाल. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर रिअल्स बनवून टाकत आहेत. शीर्षक गीत तर सर्वांच्याच पसंतीस पडले आहे पण ही मालिकाही प्रेक्षकांना तेवढी आवडेल का? हे तर येणारे काही दिवसच ठरवतील. या मालिकेत तुम्हाला सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत दिसतील.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे जे टायटल सॉंग आहे तेही खूप चांगले बनवले आहे आणि आज इथे तुम्हाला याच टायटल सॉंगच्या डान्स प्रॅक्टिसचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. श्रेयस आणि प्रार्थना हे दोघेही तुम्हाला उत्तम डान्स करताना दिसतील. त्यांच्याबरोबर इतर लोकही तुम्हाला दिसतील जे या शूटिंगमध्ये सहभागी असतील. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडेल.
पहा व्हिडीओ: