देवमाणूस मालिकेतील अपर्णा ला पाहून वेडे व्हाल

कलाकार

श्वेता शिंदेच्या झी मराठी ‘देवमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील आजी, टोन्या आणि डिंपल हे त्रिकुटामुळेच खूप प्रेक्षक असेही असतील जे या तिघांमुळे मालिका बघत आहेत. या तिघांच्याही अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत विविध घटना दाखवल्या आहेत ज्याची तुम्हाला पुढे काय होईल हे पाहण्याची नेहमीच उत्सुकता असेल.

ही मालिका एक सायको थ्रिलर मालिका आहे. पेशाने किलर असलेला डॉक्टरला त्याचे पेशंट हे देवमाणसासारखे समजतात. या मालिकेमध्ये अपर्णा हे एक पात्र आहे जिच्याबद्दल आपण आज इथे माहिती घेणार आहोत. अपर्णाचे खरे नाव ऐश्वर्या नागेश आहे. ती मुळची चिपळूणची. डीपीजी महाविद्यालयात तिने शिक्षण घेतले होते.

तिने बऱ्याच महाविद्यालयीन स्तरावर एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आहे आणि बरीच बक्षिसेही जिंकली आहेत. ती एक अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. कथाकथन, मॉडेलिंग, चित्रकला, रांगोळी स्पर्धेत तिने यश मिळवले आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘ # ही टू’ या शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. त्यात तिचा मुख्य रोल होता आणि याच लघुपटातील भूमिकेमुळे ती चर्चेत आली होती.

ही शॉर्टफिल्म अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली आहे. ती मिस कोकण २०१९ ची विजेती होती. एसटी महामंडळाच्या निवृत्त वाहतूक निरक्षक प्रकाश नागेश यांची ती मुलगी आहे. सध्या ती एएलएसजे कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेते आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुर रंगाचा विद्यार्थी गोडबोले हा पुरस्कार मिळवला होता.

यापूर्वी तिने अनेक मालिका आणि शॉर्टफिल्म मध्ये काम केले आहे. दूरदर्शन वरील ‘भ्रमंती महाराष्ट्राची’ या शोचे निवेदन केले आहे. ‘असंही घडू शकते’ हे नाटक सुद्धा तिने केले आहे. ऐश्वर्या आता देवमाणूस मालिकेमध्ये अपर्णा ही भूमिका साकारताना दिसत आहे. अर्पणा ही या क्रूर डॉक्टरच्या जाळ्यात अडकेल का हे मालिकेमध्येच बघायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *