स्वतःच्याच लग्नात नवरा नवरी ने वाजवला बेंजो, वायरल व्हिडीओ बघून तुम्हालाच नाचू वाटेल

कलाकार

‘हौसेला काही मोल नसते’ हे खरंच बरोबर वाक्य आहे. जगात सगळीकडेच बरेच कार्यक्रम असतात त्यातलाच लग्नसोहळा हा एक आहे. काही घरांत असे असते की , कोणता कार्यक्रम आयोजित करणार असेल तर कोणालाही काही कमी पडू नये. कार्यक्रमात सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात. मनोरंजन, संगीत, गाणी, डान्स तसेच उत्तम आणि स्वादिष्ट जेवण या गोष्टी असल्या की कार्यक्रमात मजा तर नेहमी येणारच.

परंतु काही जणांना वाटते की, अशा गोष्टीत पैसे वाया घालवण्यापेक्षा एखाद्या समाजसेवा संघटनेला मदत करावी किंवा गरिबांची मदत करावी. गरिबांना अन्न, कपडे मिळाले आणि त्यांचा आनंद पाहिला की मन भरून येते. त्यामुळे काहीजण कोर्ट मॅरेज करतात. एखादा असा असतो की मला एकुलता एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यामुळे लग्नसोहळा तर धुमधडाक्यातच होणार.

आता तर बरेच नवीन ट्रेंड आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरेच जण आता लग्नाआधीच फोटोशूट करतात आणि जसजसे लग्न जवळ येईल तसं एक एक फोटो सोशल मीडियावर टाकत जाणार. लग्नातही व्हिडिओ शूटिंग उत्तम दर्जाची केली जाते ज्यामध्ये ड्रोन आणि हायक्वालिटी कॅमेरा वापरले जातात. काही लग्नात नवरा किंवा नवरी हे एकमेकांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी डान्स करत असतात.

काही दिवसांपूर्वी एका नवरीचा व्हिडिओ वायरल झाला होता ज्यात ती लग्नाच्या स्टेजपर्यंत स्टायलमध्ये नाचत जात होती. नुकतंच असाच काहीसा वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. सामान्यपणे आपण लग्नात नवरा किंवा नवरीला नाचताना पाहतो परंतु या व्हिडिओत तुम्ही चक्क नवरा आणि नवरीला बँजो वाजवताना पाहाल. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही ते पाहून खूप छान वाटेल.

आधी नवरा मुलगा वाजवायला चालू करतो आणि वाजवताना तो नाचतही आहे. काही वेळाने नवरी मुलगी येते आणि तिलाही वाजवण्याचा आग्रह करतात. तुम्ही व्हिडिओत पाहिले असेल तर नवरी सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. या दोघांचेही बरेच कौतुक करण्यात आले. या दोघा नवरानवरीने लग्नात बँजो वाजवून असे काही हटके केले आहे. जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही तुमच्या लग्नात असे काही हटके करणार आहे का? किंवा कोणा दुसऱ्यांच्या लग्नात तुम्ही काही वेगळे पाहिले आणि ते तुम्हाला आवडले? असे काही असेल तर आम्हाला नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *