रेल्वे चालवणाऱ्या या मुली पाहून गर्व वाटेल

कलाकार

महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील सहभाग हा पुरुषांना टक्कर देण्यासारखा आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे तुम्हाला आता महिला दिसणार नाही. आर्मी, पोलीस, नासा, औद्योगिक कंपन्या अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महिला या अग्रस्थानी आहेत. तसेच महिलांना किंवा मुलींना अडचणीच्या गरज पडली तर त्याला तोंड देत यावे म्हणून वेगळे वेगळे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते जेणेकरून त्या स्वतःची सुरक्षा करतील.

स्वतंत्रपणे महिला या बऱ्याच क्षेत्रात वावरत आहेत आणि स्वतःचे आयुष्य जगत आहेत. आता महिलांना त्यांच्या घरच्यांनी केलेली मारहाण किंवा पतीने केलेली मारहाण हे सहन करण्यापलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी करण्यासाठी उपलब्ध आहेत. सायकल, गाडी तसेच विमान चालवणे तुम्ही पाहिले असेल परंतु महिलांनी रेल्वे चालवणे हे जरा नवीनच आहे, नाही का?

जर तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर चकित होऊन राहाल. या व्हिडिओत तुम्हाला चक्क दोन मुली रेल्वे चालवत असताना दिसतील. या मुली रेल्वे चालवण्यात अगदी कुशल आहेत असे दिसत आहे. रेल्वे चालवणे ही काही सोप्पी गोष्ट नाही यासाठी बऱ्याच गोष्टीचे प्रशिक्षण घ्यावे लागते. जर तुम्ही विडिओ पाहाल तर तुम्हाला त्या मुली रेल्वे चालवताना किती लक्ष देत आहेत हे समजेल.

वेळोवेळी त्या हॉर्न देऊन बाकी लोकांना सतर्क करत आहेत तर ज्यावेळी त्यांना काही माहिती पाहिजे असेल तेव्हा त्या स्टेशनबरोबर संवादही करत आहेत. या रेल्वेचा नंबर 12613  आहे आणि ही टिपू एक्सप्रेस, मैसूर ते बेंगळुरू पर्यंतची आहे. तुम्ही पाहिले असेल, ज्यावेळी एक स्टेशन येते त्यावेळी या दोघीही दोन्ही बाजूने हिरवा झेंडा सुद्धा दाखवत आहेत. रेल्वे ट्रॅकची माहिती सुद्धा त्यांना अचूकपणे लागते. तुम्हाला वाटत नाही का या मुली खरंच खूप धाडसी आहेत. तुमची मते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *