अंबानींच्या मागे पुढे असतो इतक्या गाड्यांचा ताफा

कलाकार

जगातील सर्वात श्रीमंत अशा अंबानी परिवाराला कोण नाही ओळखत. संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी आज जगात १० व्या स्थानावर आहेत तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु हे समाजसेवा सुद्धा तेवढ्याच चांगल्या मनाने करतात. परंतु अशा एवढ्या श्रीमंत व्यक्तींना बाकी लोकांपासून धोका सुद्धा तेवढाच जास्त असतो त्यामुळे त्यांना आपल्यासाठी तेवढी सुरक्षा बाळगावीच लागते.

हे श्रीमंत व्यक्ती आपल्या सामान्य व्यक्तींप्रमाणे इकडे तिकडे कुठेही नाही फिरू शकत कारण त्यांना बराच धोका असतो. आज आपण येथे अंबानी परिवाराच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दलच बोलणार आहोत. अंबानी परिवार सध्या अँटिलिया या २७ मजली आलिशान इमारतीमध्ये राहतात. या इमारतीमध्ये ६०० लोकांना कामाला ठेवले आहे तसेच इथे ३ हेलिपॅडस, स्वीमिंगपूल, थिएटर, १६० गाड्यांचे गॅरेज आहे.

अंबानीने मुंबई इंडियन्सच्या टीमला सुद्धा खरेदी केले आहे. या घराच्या आजूबाजूला एवढी सुरक्षा आहे की तुम्ही त्याचा विचार सुद्धा नाही करू शकत. मुकेश अंबानीना झेड प्लस सेकरिटी देण्यात आली आहे जी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या जाणाऱ्या सेक्युरिटीच्या नंतरची आहे म्हणजेच दुसऱ्या स्थानाची आहे.

सरकारच्या सुरक्षेबरोबरच अंबानीनी स्वतःची पण सुरक्षा टीम बनवली आहे ज्यात आर्मीतील जवान आहेत. घराच्या बाहेर तर २४ तास सुरक्षा पहारेकरी, सीसीटिव्ही कॅमेरा तसेच पोलीस व्हॅन सुद्धा असतात. जिथे जिथे ते जातात तिथे सुरक्षा कर्मचारी हजर असतात आणि त्या सर्वांचा खर्च अंबानी स्वतः करतात.

जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा बुलेटप्रूफ तसेच बॉम्बप्रूफ गाड्या असतात आणि बरोबरच गाड्यांचा ताफा असतो ज्यात त्यांची सेक्युरिटी असते. घरात कोणीही येणार असेल तर सेक्युरिटी चेक झाल्याशिवाय कोणीही आत जाऊ शकत नाही. तुम्हालाही मुकेश अंबानीची सुरक्षा व्यवस्था कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *