चोरीचे बरेच कि’स्से तुम्ही ऐकले असतील. चोरी अनेक ठिकाणी होते जसे की ज्वेलर्सच्या दुकानात, कपड्याच्या दुकानात, घर, मॉल इत्यादी. चोरी ही अत्यंत कुशल पद्धतीने केली जाते जेणेकरून कोणालाही तुम्ही ते सामान चोरी केले आहे हे समजू नये. चोर एवढे हुशार झाले आहेत त्यामुळे आता दुकानदार तसेच सामान्य माणसे सुद्धा चोर चोरी कशी करतात
हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतात आणि चोरांनी त्याप्रमाणे चोरी केली तर आपण त्याला कसं पकडणार याची योजना आखू लागतात. बऱ्याच मोठ्या दुकानांत अनेक ग्राहक येत असतात त्यामुळे दुकानदाराला सर्वांवर लक्ष ठेवायला जमत नाही आणि याचाच बरेचजण फायदा घेतात आणि सामान चोरून नेतात. त्यामुळे दुकानात तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता कॅमेरे लावलेले पाहिले असतील.
जेणेकरून दुकानदार कॅमेरामधून सर्वांना पाहू शकेल आणि कोणी चोरी करत असेल तर त्याला पकडू शकेल. असाच एक किस्सा घडला आहे एका छोट्या मॉलमध्ये. या मॉलमध्ये एका बाईने चोरी केली आणि तिला नंतर पकडले गेले. जेव्हा पकडले आणि तिला चोरलेले सामान परत द्यायला लावले तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तिने कुठून कुठून चोरलेले सामान बाहेर काढले.
तिने तिच्या साडीच्या आतमध्ये कपड्यालाच एक कप्पा बनवून घेतला आहे ज्यामध्ये तिने सामान टाकले. हए कोणालाही सहजासहजी ओळखू नाही येणार. चोरलेल्या सामनामध्ये कपडे, साबण, क्रीम्स अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यावेळी तिला पर्स दाखवायला सांगितली तेव्हा ती दाखवायला तयार होत नव्हती.
त्यातही तिने तेलाच्या पिशव्या आणि अजूनही सामान चोरून ठेवले होते. ती बाई घाबरलेली दिसत होती आणि तिला पोलिसांच्या ताब्यात देणार अशी तिला भी’ती आहे. तुम्ही कधी अशी चोरांची चोरी करण्याची काही वेगळी गोष्ट पाहिली आहे का? आमच्याबरोबरही नक्की शेअर करा.
पहा व्हिडीओ: