अनेक जणांना टीव्ही वर येणारा आदेश बांदेकर यांचा ‘होम मिनिस्टर‘ हा कार्यक्रम ओळखीचा असेल. यामध्ये आदेश बांदेकर बऱ्याच ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम घेत असे आणि यामध्ये अनेक महिला सहभाग घेत होत्या. असाच एक कार्यक्रम आहे ज्याचे नाव आहे ‘खेळ पैठणीचा‘. हा ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम क्रांती मलेगावकर हे होस्ट करतात.
क्रांती यांनी आजवर अनेक ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांचा समावेश आहे. अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. क्रांती हे एक उत्तम गायक आहेत आणि त्याबरोबरच ते कॉमेडी सुध्दा खूप छान करतात. इथे आज खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा एक छोटासा
व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये तुम्ही क्रांती यांच्याबरोबर तिघींना स्टेजवर पाहू शकता. क्रांती हे गाणे म्हणत आहेत आणि या तिघी त्यावर नाचत आहेत. ‘कैरी पाडाची‘ या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. त्यांचा आवाजही तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
पहा व्हिडीओ: