देवमाणूस मधील मंजुळा पाहा किती हॉट आहे

कलाकार

‘देवमाणूस’ ही मालिका तुम्ही पाहिलीच असेल. ही मालिका एक सीरिअल किलर बद्दल आहे. या मालिकेत एक नवीन पाखरू आले आहे ज्यावर डॉक्टरचा जीव अडकला आहे. पण ते पाखरू डॉक्टरला काही भिक घालत नाहीये. अशा या नवीन पाखराचं नाव मंजुळा आहे. चला तर मग जाणून घेऊया मंजुळाच्या खऱ्या आयुष्यातील माहिती.

मंजुळा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री प्रतिक्षा जाधव ही साकारत आहे. तिचा जन्म १७ जानेवारी १९९० ला झाला. ती मुळची पुण्यातलीच आहे. कॉलेजपासूनच तिला अभिनयाची आवड होती. तसेच ती उत्तम नृत्य सुद्धा करते. २००० मध्ये ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटापासून तिने पडद्यावरील कामाला सुरुवात केली. ‘अरे देवा, जखमी पोलीस ३०२, तात्या विंचू लगे रहो, पावर, हे मिलन सौभाग्याचे’ असे चित्रपटही केले आहेत.

‘भुताचा हनीमून’ या चित्रपटातील अभिनयामुळे ती जास्त प्रसिद्धीस आली. २०२० मध्ये ‘खेळ आयुष्याचा’ या चित्रपटातही तिने काम केले. ‘करून गेलो गाव’ अशाच अनेक नाटकातही तिने काम केले आहे. तिने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तेलगू सिनेसृष्टीत सुद्धा काम केले आहे. प्रतिक्षाला आपण ‘मोलकरीण बाई, छोटी मालकीण, दिल ढुंढता है, दिल्या घरी तू सुखी रहा’

यांसारख्या मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिले आहे. ‘हे गणराया’ या अल्बममध्ये सुद्धा तिने काम केले आहे. सध्या ती ‘देवमाणूस’ या मालिकेत मंजुळाचे पात्र साकारत आहे. ही मंजुळा त्या वाईट डॉक्टरच्या जाळ्यात अडकेल का? हे आपल्याला मालिका पाहूनच समजेल. तुम्हालाही प्रतिक्षाचा अभिनय कसा वाटतो हे नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *