अगंबाई सासूबाई मधील या मोठ्या अभिनेत्याचे झाले निधन

कलाकार

आग्गबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडली. या मालिकेत आपण नवरा-बायको, आई-मुलगा, सासू-सून या सगळ्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बघितले. या मालिकेत आपण निवेदिता यांना सासूची भूमिका साकारताना पाहिले तर गिरीश ओक यांना शेफ अभिजित राजे यांची भूमिका साकारताना पाहिले. या ‘आग्गबाई सासूबाई’ मालिकेत आपण पहिल्यांदाच असे पाहिले असेल की, सून ही सासूचे लग्न लावून देते.

याच मालिकेतील एका अभिनेत्याचे आज निधन झाले आहे. या २०२० वर्षी आपण आपल्या बऱ्याच नातेवाईकांना, अभिनेते आणि अजून बरीच नाती असलेल्यांना गमावले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्याची माहिती. या मालिकेत आजोबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे आज ६ डिसेंबर २०२० ला निधन झाले आहे.

त्या आजोबांचे खरे नाव रवी पटवर्धन हे आहे. रवी पटवर्धन यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ मध्ये झाला. कोरोनामुळे रवी हे शूटिंग करताना खूप काळजी घेत होते. परंतु त्यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. त्यांना याआधीही मार्च महिन्यात हृदय विकाराचा झटका आला होता. निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान इत्यादींना रवी अचानक गेल्यामुळे धक्का बसला आहे.

या ‘आग्गबाई सासूबाई’ मालिकेतील आजोबांचा ‘कोंबडीच्या, चप्पलचोर’ या डायलॉग्सची आता प्रेक्षकांना आठवण येईल. रवी हे एक उत्तम अभिनेते होते. त्यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट मालिका, चित्रपट केले आहेत. ‘आग्गबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. रवी यांना आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *