सहकुटुंब सहपरिवार मधील पश्या पहा

कलाकार

सध्या स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका दर्शकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. यामधली अंजी आणि पश्याची जोडी तर दर्शकांच्या मनाला खूपच भावली आहे. या दोघांमध्ये नेहमी वादविवाद, रुसवे फुगवे चालू असतात. सध्या त्यांच्यात घटस्फोटचा विषय घरी कसा सांगावा याची घालमेल चालली आहे.

तर आज आपण याच अंजी आणि पश्याच्या जोडीमधील पश्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत. पश्याचे खरे नाव आकाश नलावडे आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९१ ला पुण्यात झाला. आकाशचे शालेय शिक्षण महाराष्ट्र विद्यामंदिर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील कावेरी कॉलेजमधून पूर्ण झाले आहे. त्याने कॉमर्सची पदवी सुद्धा घेतली आहे.

आकाशने अभिनय क्षेत्राची कोणती पार्श्वभूमी नसताना देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ललित कला केंद्र येथून आकाशने अभिनयाचे धडे घेतले आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही आकाशची पहिलीच मालिका आहे त्यामधून त्याने पडद्यावरील त्याच्या अभिनयाला सुरुवात केली. पहिली मालिका असूनदेखील त्याचा अभिनय आणि त्याने केलेले कष्ट तुम्हाला त्याच्या अभिनयातून दिसून येत असेलच.

त्याने अगदी कमी वेळेत दर्शकांना आपण चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिले आहे. आकाशने एका चित्रपटासाठी सुद्धा अभिनय केला आहे तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. तो चित्रपट आल्यानंतर आपल्याला त्याच्या अभिनयाची कुशलता नक्की दिसुल येईल. त्याच्या या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आकाशचा अभिनय तुम्हालाही कसा वाटतो हे कंमेन्ट मध्ये सांगायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *