कधी लोकांच्या मागे नाचणारी हि मुलगी आता गाजवते बॉलिवूड च मैदान

कलाकार

बॉलीवूडमध्ये एक वेळ अशी होती की, त्यावेळी माधुरीच्या अभिनयाची आणि नृत्याची कोणीच बरोबरी करू शकत नव्हतं. पण आता वेळ बदलली आहे. पूर्ण बॉलीवूड आणि सोशल मीडियावर नोरा फतेहीच्या नृत्याची जादू पसरली आहे. नोरामुळे आयटम सॉंग्सला एक वेगळ्या आणि चांगल्या नजरेने पाहण्यात येत आहे.

तिचा डान्स चालू झाला की चाहते डोळ्याची पापणी सुद्धा झाकत नाहीत. नोराचा सज्जन चेहरा आणि तिच्या त्या बेली डान्सचे सर्वजण दिवाने झाले आहेत. पण एक वेळ अशीही होती की, तिच्या या डान्सवर लोक हसत होते. बॉलीवूडमध्ये आत्ता जी प्रसिद्धी तिला मिळवली आहे, त्यासाठी तिने खूप कष्ट केले आहे. नोराचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ ला कॅनडामधल्या टोरंटो शहरात झाला.

तिचा जन्म एक अरेबीक कुटुंबात झाला. नोराची आई भारतीय आहे, त्यामुळेच कदाचित नोराचा भारताकडे जास्त कल आहे. तिचे शिक्षण टोरंटोमध्येच चांगल्या शाळेतून पूर्ण झाले. तिला लहानपणापासूनच बॉलीवूड चित्रपट पाहायची खूप आवड होती. जेव्हा नोराने घरी सांगितले की, तिला अभिनेत्री बनायचे आहे आणि डान्स करायचा आहे तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला विरोध केला कारण त्यांच्या समाजात कोणी असे करत नाही.

तरीही नोराने डान्स सराव चालू ठेवला. एकदा शाळेतील मित्रांना तिने डान्स करून दाखवला पण ते हसू लागले. तरीही नोराचे मनोबल कमी नाही झाले. काही कारणांमुळे तिच्या आई वडिलांच्या घटस्फोट झाला. त्यामुळे नोराच्या खांद्यावर कुटुंबाचे ओझे आले. तिने हॉटेलमध्ये नोकरी केली आहे.त्याबरोबरच तिने थोडेफार फोटोशूट सुद्धा केले. २०१२ ला नोरा मुंबईला एका एजन्सीने शूटसाठी बोलवले पण त्यांनी तिला फसवले.

नंतर तिने चित्रपटांसाठी ऑडिशन्स द्यायला चालू केले. नोराने ‘रोअर टायगर ऑफ द सुंदरबन’ या तिच्या पहिल्या चित्रपटात काम केले पण तो फ्लॉप गेला. नंतर तिने आयटम सॉंग्स करायचे ठरवले आणि ‘बाहुबली’ चित्रपटात सुद्धा एका गाण्यात ती आहे. ‘बिग बॉस ९’ मध्ये नोराला संधी मिळाली आणि ती बरीच प्रसिद्ध सुद्धा झाली.

‘सत्यमेव जयते मधल्या दिलबर दिलबर, बाटला हाऊस मधल्या ओ साकी साकी रे, स्ट्रीट डान्सर ३ मधल्या गर्मी’ असे अनेक गाणे तिने केले आणि खूप सुपरहिट झाली. नुकतेच रिलीज झालेले ‘नाच मेरी राणी’ हे गुरू रंधवाचे गाणे सुद्धा खूप प्रसिद्ध झाले. ‘झलक दिखला जा’ मध्येही ती जज म्हणून होती. अभिनेता अंगद बरोबर नेहाचे प्रेमप्रकरण चालू होते परंतु नंतर अंगदने नेहा धुपिया बरोबर लग्न केले. नोराने नंतर आपल्या करिअरकडे लक्ष दिले. सध्या ती एक यशस्वी डान्सर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *