नि ळू फुले एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात नि ळू फुले: काय बाई आहेत का?

कलाकार

जोक :
नवरा : (लाडात येऊन)- माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
बायको : मग काय माझं तुमच्यावर प्रेम नाही का माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे,
तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते.
नवरा : पण तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस
बायको : अहो, असं काय म्हणता तुम्हीच तर माझं जग आहात.

जोक :

शिक्षक(फोनवरून) :हॅलो, साहेब… तुमच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक मिळवला आहे.
वडील : सॉरी, राँग नंबर. याला म्हणतात ‘आत्मविश्वास!’

जोक :

सगळे जणं २०२० ला नावं ठेवताय
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
२०२० एवढ्या सुट्ट्या परत कधीच मिळणार नाही..

जोक :

नवी नवरी सासूच्या पाया पडते
सासू – सुखी रहा
सून – तुम्ही राहू देणार का ?

जोक :

नि ळू फुले एकदा त्यांच्या लेखक मैत्रीणी च्या घरी जातात
नि ळू फुले: काय बाई आहेत का?
नोकर : बाई जरा विसावा घेत आहेत
नि ळू फुले : ठीक आहे , त्यांना सांगा एक विसावा आलाय

जोक :

जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या संमेलनात एका वर्गमित्राने व्यक्त केलेली भावना.
शाळेत असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडून नेहमीच ‘Home work’ सोडवून घ्यायची
त्यामुळे सर्व मुले माझ्यावर जळायची
मी खूष व्हायचो !
बघा काय नशिबात असतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *