या लक्जरी चालवणाऱ्या बाईला बघून गर्व वाटेल

कलाकार

संसार पुढे चालवायचा म्हणलं की, एकाला दुसरा हातभार लागलेला कधीही चांगलाच असतो. घरातील पुरुषांच्या बरोबरीनं आजकाल स्त्रिया सुद्धा स्वबळावर पैसे कमवतात. आशा स्त्रियांना पैशांसाठी पुरुषांवर अवलंबून राहावे लागत नाही. या त्यांच्या मनाने ज्या गोष्टी पाहिजेत त्या घेऊ शकतात. देशातच काय पूर्ण जगात अजूनही असे लोक आहेत जे महिलांना घराबाहेर पडू देत नाहीत.

त्यांना जे शिकायची इच्छा आहे त्यापासून लांब ठेवतात आणि घरातील गुलाम बनवतात. आज मी जो विडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो विशिष्ट करून महिला वर्गासाठी खूप प्रेरणादायी आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आपण काहीतरी वेगळे करावे असे वाटेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला चक्क वोल्वो चालवताना दिसेल.

आत्तापर्यंत आपण महिलांना बाईक, कार चालवताना पाहिले आहे परंतु वोल्वो ही लक्झरी बस चालवताना पहिल्यांदाच बघत असू. या महिलेला या बसची पूर्ण माहिती आहे. ती जेव्हा वोल्वो चालवायला ड्राइवर सीटवर बसते आणि चालवू लागते तेव्हा तिचा आत्मविश्वास बघण्यासारखा आहे. तिला गाडीच्या साध्या गोष्टीपासून म्हणजेच दार ओपन करणे, स्टेरिंग अड्जस्ट करणे तसेच इतरही वैशिष्ट्य माहीत आहेत त्याशिवाय कोणीही एवढ्या आत्मविश्वासाने वोल्वो नाही चालू शकणार.

ती महिला भुवनेश्वर येथे वोल्वो चालवत आहे. तुम्ही जर पूर्ण विडिओ पहिला तर ती रिकाम्या रोडवर तसेच गर्दीच्या ठिकाणीही वोल्वो अत्यंत नीटपणे चालवत असताना दिसत आहे. पूर्ण विडिओमध्ये पाहिले तर तिने एवढी मोठी वोल्वो चालवताना सुद्धा तिची परंपरा नाही सोडली. तिने साडी नेसून ही गाडी चालवली आहे आणि तिच्या डोक्यावर पदरही आहे. यावरून महिलांनी कितीही पुढे जावे परंतु आपली संस्कृती विसरू नये, हा चांगला संदेश तिने सर्वांना दिला आहे. तुम्हालाही तिचा हा आत्मविश्वास आणि वोल्वो चालवण्याच्या धाडसाबद्दल काय वाटते, कमेंटद्वारे नक्की कळवा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *