सैराट मधला परश्या आता करतो हे काम

कलाकार

२०१६ मध्ये नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने एक नवा इतिहास घडवला. या इतिहासाचे शिलेदार होते या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा आर्ची आणि परश्या. परश्या ची भूमिका करणारा आकाश ठोसर या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला. आकाश मूळचा सोलापूरचा. इतर मुलांप्रमाणे चित्रपट बघण्याची आवड असलेला. मात्र एक दिवस त्याचं नशीब बदललं आणि ‘सैराट’ नावाच्या चित्रपटात त्याने चक्क मुख्य नायकाची भूमिका केली.

 

आपण अभिनय करावा हे काही आकाशचं पहिल्यापासूनचं स्वप्न नव्हतं. पण सैराटच्या यशानंतर त्याने अभिनयाचं क्षेत्र निवडलं आणि त्यासाठी लागणारी सगळी मेहनत केली आणि अजूनही करतो आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी आकाश कुस्ती खेळायचा. आकाशला चित्रपट बघायला आवडतं. अमिताभ बच्चन हा आकाशचा आवडता अभिनेता. नागराज मंजुळेंचा फॅन्ड्री हा चित्रपट देखील आकाशला आवडतो.

नागराज मंजुळे त्याच्याच गावचे असल्याने त्याने त्यांना बऱ्याचदा गावात बघितलं होतं, पण कधी जाऊन बोलायची हिंमत झाली नाही. सैराटच्या ऑडिशनच्या वेळी नागराज यांच्या छोट्या भावाने आकाशला पाहिले आणि ऑडिशन देण्याविषयी सुचवले. दोनच दिवसांत त्याची निवड झाली आहे असे त्याला कळले. या चित्रपटासाठी त्याला वजन कमी करावे लागणार होते जे त्याने केले देखील. त्यापुढे घडला तो ‘सैराट’ नावाचा इतिहास.

आकाशने त्यानंतरही आपला अभिनय क्षेत्रातला प्रवास चालू ठेवला. ‘एफ यू: फ्रेंडशिप अनलिमिटेड’ (२०१७) हा मराठी चित्रपट, ‘लस्ट स्टोरीज’ (२०१८) आणि ‘झुंड’ (२०२०) हे हिंदी चित्रपट, १९६२: द वॉर इन द हिल्स ही वेब सिरीज यामध्ये आकाशने काम केले आहे. नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नसला तरी आकाशची त्याच्या आवडत्या अभिनेत्याबरोबर म्हणजेच अमिताभ बच्चन बरोबर काम करण्याची इच्छा या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

आकाश ठोसर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी कुस्ती खेळात होता हे आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे. तेव्हापासून त्याला व्यायामाची आवड आहे. चित्रपटांसाठी वजन कमी केले असले तरी आकाशचे व्यायामावरचे प्रेम अजूनही तसेच आहे. खूपदा तो सोशल मीडिया वर आपले जिम मधले किंवा व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असतो. आकाशने व्यायाम करून पिळदार शरीरयष्टी कमावली असून तरुणी त्याच्यावर फिदा न होतील तरच नवल आहे! आकाशला आपण अजूनही बऱ्याच चित्रपटांत नक्कीच बघू शकू. अर्थातच त्याच्या या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन देखील आपल्याला या चित्रपटांमधून होत राहील ही आशा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *