पोट भरण्यासाठी रेल्वेत गाणं बोलणारा मुलगा पाहून दया येईल

कलाकार

भारतात पैसे मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. देशाची लोकसंख्या खूप जास्त असल्याने बरेचजण बेरोजगार राहतात आणि परिणामी गरिबी सुद्धा वाढते. बहुतांश लोक हे जरी सुशिक्षित झाले असले तरी अनेकजण अजूनही निरक्षर आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जे भेटेल ते काम करतो. गरिबी असल्याने आणि रोज पोट भरण्यासाठी गरिबांना त्यांच्या लहान मुलांनादेखील पैसे कमवण्यासाठी पाठवावे लागते.

लहान लहान मुलं ज्यांचे शाळेत जाण्याचे, हसण्याखेळण्याचे दिवस असतात त्यावेळी ते पैसे कसे मिळवायचे हे बघत असतात. खरंच हे खूप वाईट आहे की लहान मुलांना अशी काम करावी लागतात. असाच एक व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला त्या मुलाची दया येईल. हा छोटा मुलगा पैसे कमवण्यासाठी रेल्वेमध्ये ढोलकीच्या साहाय्याने गाणे म्हणत आहे.

ज्या कोणी येणाऱ्या जाणाऱ्याला ते गाणे आवडेल तर ते या मुलांना पैसे देतात आणि तीच यांची कमाई असते. मुलाचे ते वाद्य वाजवण्याचे कौशल्य आणि गाणे म्हणण्याची कला पाहून तुम्हीही दंग राहाल. ओरिजिनल गाणे आणि याचे स्वतःचे एक वेगळेच ताल सूर असलेले गाणे ऐकून तुमचेही मन प्रसन्न होईल. अशा हुशार मुलांना खरंतर शिक्षण घेतले पाहिजे. तुम्हालाही अशी मुले कधी प्रवास करताना किंवा फिरताना आढळली तर त्यांना तुम्ही नक्कीच मदत करावी. तुमचीही या विषयावर काय मते आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा.

पहा व्हिडीओ:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *